सदोष VVPAT प्रकरणी हायकोर्ट कठोर, निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 06:42 PM2017-11-07T18:42:46+5:302017-11-07T18:46:20+5:30

विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती.

faulty vvpat devices gujarat high court serves notice to election commission | सदोष VVPAT प्रकरणी हायकोर्ट कठोर, निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस    

सदोष VVPAT प्रकरणी हायकोर्ट कठोर, निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस    

Next

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने आज कॉंग्रेस पक्षाच्या एका याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. येथील विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती. त्यामुळे सदोष आढळलेल्या इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशिन्सचा गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये वापर करू नये अशी याचिका कॉंग्रसेने केली होती.    

न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती ए.जे.कोगजे यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि विधी मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारला ही नोटीस जारी केली आहे. या सर्वांना 13 नोव्हेंबरपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. 

VVPAT मशीन झाल्या फेल -
एकूण 70 हजार 182 VVPAT मशीनपैकी जवळपास 7 टक्के मशीन निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत फेल झाल्या आहेत. या सर्व मशीन सील केल्या जाव्यात तसंच विधानसभा निवडणुकांमध्ये यांचा वापर करू नये अशी याचिका कॉंग्रसेने केली होती. याबाबत कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे अथवा यासाठी एखाद्या समितीची स्थापना करावी अशी मागणील याचिकेत केली होती. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.    
यापूर्वी  गुजरात निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानेही VVPAT मशीनवरून भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत 3500 VVPAT मशीन फेल झाल्या. आता भाजपा निवडणुकांमध्ये गोलमाल करूनच लढेल असा माझा दावा आहे असं हार्दिक पटेल म्हणाला होता.  

Web Title: faulty vvpat devices gujarat high court serves notice to election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.