लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:02 IST2025-12-23T19:01:32+5:302025-12-23T19:02:09+5:30
तारिक आपल्या मुलीला शाळेत सोडून परत फिरत असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडली.

लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या स्याना कोतवाली परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ADL स्कूलच्या बाहेर एका व्यक्तीचा अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. तारिक मेवाती असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आला होता.
सकाळी शाळा भरण्याच्या वेळी ही धक्कादायक घटना घडली. तारिक आपल्या मुलीला शाळेत सोडून परत फिरत असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो अचानक जमिनीवर कोसळला. ही संपूर्ण घटना शाळेबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
#उत्तरप्रदेश के #बुलंदशहर जिले के कस्बा स्याना में बेटी को छोड़ने आए तारिक मेवाती की स्कूल गेट पर अचानक मौत हो गई। pic.twitter.com/IOze1OI1i0
— वर्तमान न्यूज़ (@nvartmaan) December 21, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, तारिक मेवाती बेशुद्ध झाला. शाळेतील कर्मचारी धावत आले आणि त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. रुग्णालयात आणण्यापूर्वीच तारिकला 'कार्डियक अरेस्ट' आला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तारिकला कोणताही मोठा आजार नव्हता किंवा त्याने कधीही प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तारिक पूर्णपणे निरोगी होता आणि नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडला होता, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.