ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:39 IST2023-05-31T15:38:06+5:302023-05-31T15:39:06+5:30

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. 

Fatal accident involving truck and cruiser; 5 dead, woman critical in hisar hansi | ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर

ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर

नवी दिल्ली - हांसी येथे दिल्ली मार्गावर ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी महिलेला हांसी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला हिसार येथे रेफर करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. 

हिसार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर भीषण अपघात झाला. त्यामध्ये, ५ जणांचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रुझरमधील इतर जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णावाहिकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, मृत व्यक्तींचे पार्थिव शवगृहात ठेवण्यात आले आहे. मृत व्यक्तींची नावे संदीप, प्रदीप, परवीन व प्रकाश असून ते हांसीचे रहिवाशी आहेत. भाटोल रंगडान येथील अनुप अशी मृतांची ओळख पटली आहे.

प्रदीप हा या गाडीचा चालक होता, जो खरकडा येथून हांसीच्या दिशेने निघाला होता. मात्र, वाटेतच त्याला संदीप, प्रवीण, अनूप, प्रकाश व एक महिलेची भेट झाली. त्यामुळे, हे सर्वजण क्रुझरमधून हांसीकडे निघाले. दरम्यान, महामार्गावरच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये, ५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी, प्रदीप हा मोठच्या खासगी शाळेत गाडी चालवत होता. संदीप हा हिसार मार्गावरील परिवहनच्या बसमध्ये वाहक होता. प्रवीण हा हांसीच्या सरकारी इंजिनिअरींग कॉलेजचा विद्यार्थी होता. तर अनुप हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता.
 

Web Title: Fatal accident involving truck and cruiser; 5 dead, woman critical in hisar hansi