सिक्कीममध्ये भीषण अपघात, लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; चार जवानांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:28 IST2024-09-05T16:26:19+5:302024-09-05T16:28:58+5:30
सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात एका अपघातात लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

सिक्कीममध्ये भीषण अपघात, लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; चार जवानांचा मृत्यू
सिक्कीममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिक्कीम येथील पाक्योंग जिल्ह्यात लष्कराच्या जवानाच्या वाहनाचा अपघात झाला, या अपघातात चार जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातस्थळी मदत मोहिम सुरू आहे.
ऐकावं ते नवलच! ३४ वर्षांपूर्वी २० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अखेर अटक होणार
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचा ट्रक पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील जुलुककडे रेशीम मार्गावर जात होते. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटून ते खोल दरीत कोसळले. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी चार जवानांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. सर्व मृत जवान पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील युनिटचे होते.
मृतांमध्ये चालक मध्य प्रदेशातील प्रदीप पटेल, मणिपूर येथील पीटर, हरियाणातील नाईक गुरसेव सिंह आणि तामिळनाडू येथील सुभेदार के. थांगापांडी यांचा समावेश आहे.