शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

गाडी घरात असतानाच FASTag मधून टोल कापला गेला! NHAI ने 18 लाख लोकांचे पैसे परत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:54 IST

2025 मध्ये 18 लाख प्रकरणांत चुकीची टोल वसुली; सरकारचा लोकसभेत खुलासा!

FASTag Payment Error: फास्टैग सिस्टम में हुई गड़बड़ियों को लेकर बड़ा खुलासा सामने आया है. नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया यानी NHAI ने करीब 18 लाख मामलों में टोल की रकम वापस की है. सरकार ने माना है कि, ज्यादातर मामलों में मैनुअल एंट्री के कारण गलत टोल कट गया है.

Wrong FASTag payment: तुमची कार घरातच आहे, तुम्ही कुठेही प्रवास केलेला नाही, तरीही मोबाईलवर अचानक टोल कापल्याचा मेसेज येतो...असे कधी तुमच्यासोबत झाले आहे का? अनेक वाहनधारकांसोबत असे घडले आहे. अधिकृत सरकारी नोंदीतही ही मोठी चूक मान्य करण्यात आली आहे.

National Highways Authority of India (NHAI) ने 2025 या वर्षात सुमारे 18 लाख प्रकरणांमध्ये चुकीची FASTag टोल वसुली झाल्याचे मान्य केले असून, संबंधित वाहनधारकांना रक्कम परत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांपैकी सुमारे 35 टक्के प्रकरणांत संबंधित गाड्या टोल प्लाझावर गेल्याच नव्हत्या, तरीही FASTag खात्यातून पैसे वसूल झाले.

कशी झाली FASTag मधील गडबड?

सरकारी माहितीनुसार, बहुतांश प्रकरणांमध्ये ही चूक टोल प्लाझावरील मॅन्युअल एंट्रीमुळे झाली. जेव्हा तांत्रिक कारणांमुळे ऑटोमॅटिक FASTag प्रणाली काम करत नाही, तेव्हा टोल कर्मचारी वाहन क्रमांक स्वतः प्रणालीत टाकतात. या प्रक्रियेत चुकीचा वाहन क्रमांक नोंदवल्याने दुसऱ्या वाहनधारकाच्या FASTag मधून पैसे कापले जातात.

लोकसभेत सरकारचा लेखी खुलासा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, National Payments Corporation of India (NPCI) ने 2025 मध्ये 17.6 लाख चुकीच्या FASTag व्यवहारांची नोंद केली, ज्यामध्ये नंतर रिफंड देण्यात आला. हे आकडे एकूण 464 कोटी FASTag व्यवहारांपैकी असले तरी, टक्केवारीनुसार हा आकडा केवळ 0.03% आहे. मात्र, वाहनधारकांच्या विश्वासाशी संबंधित असल्याने सरकार हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.

मॅन्युअल एंट्री बंद करण्याचा सरकारचा विचार

FASTag संदर्भातील चुकीच्या वसुलीच्या तक्रारी सोशल मीडियावर आणि ग्राहक मंचांवर सातत्याने समोर येत होत्या. यावर उपाय म्हणून टोल प्लाझावर वाहन क्रमांकाची मॅन्युअल एंट्री पूर्णपणे बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या चुका आणि नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

FASTagमुळे वेळ वाचला, पण तक्रारी वाढल्या

सरकारने हेही स्पष्ट केले की, FASTag लागू झाल्यानंतर टोल प्लाझावर लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. FASTag पूर्वी सरासरी 12.2 मिनिटे लागायची, आता केवळ 40 सेकंद लागतात. दरम्यान, रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2025-26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेसवेवरून 50,195 कोटी रुपयांचे टोल कलेक्शन झाले. तर मागील संपूर्ण आर्थिक वर्षात हे कलेक्शन 61,508 कोटी रुपये इतके होते.

FASTag वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना: अलर्ट त्वरित सुरू करा

जर तुम्ही FASTag व्यवहारांसाठी SMS किंवा अ‍ॅप अलर्ट सेट केले नसतील, तर ते तत्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. ICICI, HDFC, Kotak किंवा My FASTag अ‍ॅपमध्ये लॉग इन करून Settings / Manage Alerts / Notifications विभागात जा. Transaction आणि Low Balance SMS Alerts ON करा. किमान बॅलन्स मर्यादा (Minimum Balance Limit) सेट करा आणि FASTag शी जोडलेला मोबाईल नंबर योग्य व सक्रिय आहे का, याची खात्री करा.

मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स तपासणी

FASTag वापरकर्ते मिस्ड कॉल देऊनही बॅलन्सची माहिती मिळवू शकतात. अ‍ॅपमध्ये अडचण असल्यास, FASTag जारी करणाऱ्या बँकेच्या टोल-फ्री कस्टमर केअरवर संपर्क साधून SMS अलर्ट अ‍ॅक्टिव्ह करून घेता येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : FASTag Error: Toll Deducted While Car Was at Home!

Web Summary : NHAI refunded 1.8 million FASTag users after erroneous toll deductions, often due to manual entry errors. Many vehicles weren't even at the toll plaza. The government is considering ending manual entry to prevent future issues.
टॅग्स :Fastagफास्टॅगNitin Gadkariनितीन गडकरी