FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर

By संतोष कनमुसे | Updated: April 3, 2026 16:28 IST2026-04-03T16:23:57+5:302026-04-03T16:28:45+5:30

फास्टॅग वार्षिक पासची किंमत ३,०७५ रुपयांपासून असून, त्यात २०० फेऱ्यांपर्यंतचा समावेश होतो. मात्र, हा पास सर्व महामार्गांवर वैध नाही. तो केवळ एनएचएआय द्वारे संचालित महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरच चालतो.

FASTag Annual Pass Don't waste money FASTag annual pass will no longer be valid on 'this' highway; new list announced | FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर

FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर

केंद्र सरकारने महामार्गावरील प्रवास स्वस्त करण्यासाठी सुरू केलेल्या 'फास्टॅग वार्षिक पास'च्या (FASTag Annual Pass) किमतीत १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी ३,००० रुपयांना लाँच झालेला हा पास आता ३,०७५ रुपयांना मिळणार आहे. मात्र, हा पास घेण्यापूर्वी तो कोणत्या रस्त्यांवर चालणार नाही, हे जाणून घेणे प्रवाशांसाठी अनिवार्य आहे.

होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा वार्षिक पास आणला आहे. या पासद्वारे वर्षाला २०० फेऱ्यांपर्यंत प्रवास करण्याची सवलत मिळते. मात्र, हा पास केवळ NHAI च्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरच वैध आहे. राज्य सरकारद्वारे संचालित एक्सप्रेसवेवर हा पास चालणार नाही, यामुळे प्रवाशांना तिथे वेगळा टोल भरावा लागेल.

या हायवेवर फास्टॅग पास चालणार नाही

देशातील अनेक महत्वाच्या हायवेवर पास चालणार नाहीत. यामध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ द्रुतगती मार्ग, पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, यमुना द्रुतगती मार्ग आणि गंगा द्रुतगती मार्ग, महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हरयाणातील ट्रान्स-हरयाणा द्रुतगती मार्ग; आणि कर्नाटकातील बंगळूर-म्हैसूर द्रुतगती मार्ग यांचा समावेश आहे. हे सर्व रस्ते राज्य सरकारांद्वारे चालवले जातात, त्यामुळे तिथे फास्टॅग लागू होणार नाही.

फास्टॅग वार्षिक पासचे फायदे एनएचएआय द्वारे संचालित महामार्गांवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिल्ली-कोलकाता (एनएच-१९), आग्रा-मुंबई (एनएच-३), नॉर्थ-साउथ कॉरिडॉर (एनएच-४८), पोरबंदर-सिलचर (एनएच-२७) आणि श्रीनगर ते कन्याकुमारी (एनएच-४४) यांसारख्या अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. हा पास दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, ईस्टर्न पेरिफेरल रोड, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग आणि अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर देखील वैध आहे.

एनएचएआयच्या मते, या पासला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लॉन्च झाल्याच्या अवघ्या चार दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी तो खरेदी केला. सर्वाधिक पास तामिळनाडूमध्ये खरेदी केले  असून, त्याखालोखाल कर्नाटक आणि हरयाणाचा क्रमांक लागतो. याच राज्यांमध्ये टोल प्लाझावर सर्वाधिक व्यवहारांची नोंद झाली आहे. हा पास महामार्गांवरून दररोज किंवा वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे वारंवार टोल भरण्याचा त्रास कमी होतो आणि प्रवास सोपा होतो. पास खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही ज्या रस्त्यांवरून प्रवास करता ते एनएचएआयच्या अखत्यारीत येतात की नाही, हे नक्की तपासा.

Web Title : फास्टैग वार्षिक पास: जानिए यह कहाँ मान्य नहीं है!

Web Summary : फास्टैग वार्षिक पास की कीमतें 1 अप्रैल से बढ़ गईं। यह केवल NHAI राजमार्गों पर मान्य है, राज्य संचालित एक्सप्रेसवे पर नहीं। अतिरिक्त टोल से बचने के लिए खरीदने से पहले आगरा-लखनऊ या मुंबई-पुणे जैसे मार्गों पर वैधता जांचें।

Web Title : FASTag Annual Pass: Know Where It's Not Valid!

Web Summary : FASTag annual pass prices increased April 1st. It's valid only on NHAI highways, not state-run expressways. Check validity on routes like Agra-Lucknow or Mumbai-Pune before purchasing to avoid extra tolls.