Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:54 IST2026-04-04T14:53:36+5:302026-04-04T14:54:30+5:30

Video - उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

Farrukhabad woman crushed to death with thar horrific accident cctv video viral | Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,

Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  एका वृद्ध महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वृद्ध महिलेचा नातू घराच्या आतमध्ये थार गाडी पार्क करत होता. महिला मुख्य गेट बंद करण्यासाठी बाहेर उभी होती. याच दरम्यान अचानक गाडी 'बॅक गिअर'मध्ये आली आणि वेगाने मागे सरकू लागली. गाडी आपल्या दिशेने येताना पाहून महिला घाबरली आणि जोरात ओरडू लागली.

महिलेने गाडी थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण गाडीचा वेग वाढतच गेला. बघता बघता ती गाडीसोबत मागे खेचली गेली आणि काही सेकंदातच गाडी भिंतीवर जाऊन धडकली. या धडकेत महिला गाडी आणि भिंतीच्यामध्ये वाईटरित्या चिरडली गेली.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर 

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक दृष्ट्या हा एक अपघात असल्याचं दिसून येत आहे. तरीही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाचा बारकाईने तपास केला जात आहे.
 

Web Title : भारत में त्रासदी: पोते की कार से दादी की दर्दनाक मौत; बैक गियर की गलती

Web Summary : उत्तर प्रदेश में, पार्किंग करते समय पोते ने गलती से अपनी दादी को कुचल दिया। कार अचानक पीछे की ओर चली गई, जिससे वह दीवार से जा टकराईं। मौके पर ही उनकी मौत हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है, सीसीटीवी में कैद दुर्घटना।

Web Title : Tragedy in India: Grandson's Car Accidentally Kills Grandmother; Back Gear Mishap

Web Summary : In Uttar Pradesh, a grandson accidentally ran over his grandmother while parking. The car suddenly reversed, pinning her against a wall. She died instantly. Police are investigating the incident, calling it a tragic accident captured on CCTV.