'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 19:37 IST2024-08-11T19:36:16+5:302024-08-11T19:37:01+5:30
Farooq Abdullah Latest News: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी भारतीय सैन्याच्या निष्ठेवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य...
Farooq Abdullah statement on Indian Army : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी परत एकदा नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान सीमेवर देशाची सुरक्षा करणारे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सीमेवर मोठा बंदोबस्त असतानाही दहशतवादी घुसखोरी कशी करू शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते सर्व आमच्या विनाशासाठी एकत्र आले
जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 'आज आपल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले जात आहे, ही कदाचित जगातील सर्वात मोठी तैनाती आहे. तरीही सीमेपलीकडून दहशतवादी आपल्या देशात घुसतात आणि कारवाया करुन निघून जातात. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांचे संगनमत आहे. त्यांना आमचा विनाश हवा आहे, म्हणूनच ते हा खेळ खेळत आहेत,' असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
अनंतनाग चकमकीनंतर फारुख अब्दुलांचे लाजिरवाणे वक्तव्य
अनंतनागमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या चकमकीनंतर फारुख अब्दुल्ला यांचे हे वक्तव्य आले आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागच्या अहलान भागात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती.
"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल
शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन जवान शहीद आणि दोन जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेची कव्हर ऑर्गनायझेशन असलेल्या काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. काश्मीर टायगर्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध सुरूच राहील.'