"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 03:14 PM2021-09-26T15:14:14+5:302021-09-26T15:24:17+5:30

Farooq abdullah says lord ram belongs to entire world : फारुख अब्दुल्ला यांनी तीन कृषी कायद्यांवरून केंद्रावर टीका केली.

farooq abdullah says lord ram belongs to entire world not only to bjp and rss | "प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"

"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"

Next

नवी दिल्ली - जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah ) यांनी भाजपा (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शनिवारी बोलताना त्यांनी शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. कलम 370 रद्द केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला आहे. प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं. फारुख अब्दुल्ला यांनी "प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत" असं म्हटलं आहे. 

हरियाणातील जिंद येथे इंडियन नॅशनल लोक दलातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा दिवंगत उप पंतप्रधान देवीलाल यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त समारोहाला संबोधित करताना, ते बोलत होते. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या दोन वर्षानंतरही एकाही व्यक्तीला नोकरी मिळाली नाही. केंद्राने काश्मीरमध्ये 50 हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, तसं काहीच झालेलं नाही असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर फक्त धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा आणि खोटे बोलण्याचा गंभीर आरोप केला आहे. 

"आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार"

"काश्मीर भारताचा भाग कधी नव्हता? आम्ही गांधींचा भारत निवडला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणालो की, आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार. ज्या लोकांनी कलम 370 रद्द करून भारताला बळकट केल्याचा दावा केला आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी भारताला कमकुवत केले आहे. ते लोक सर्वांशी खोटे बोलते. त्यामुळे त्यांना त्यांचे मार्ग बदलावे लागतील" असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. "अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी भांडणं थांबवलं पाहिजे."

"केंद्र सरकार उद्योगपतींच्या ताब्यात आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा बळी द्यायचाय" 

"जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी मित्र राहिलात तर तुम्ही समृद्ध व्हाल. आज आमचे मित्र कुठे आहेत? नेपाळ, भूतान किंवा बांगलादेश आपले मित्र आहेत का? आपण अफगाणिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलर्स खर्च केले. आज अफगाणिस्तान आपला मित्र आहे का? लहान भावाला सोबत घेतल्यास घर समृद्ध होईल, हे मोठ्या भावाला हे समजले" असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी अब्दुल्ला यांनी तीन कृषी कायद्यांवरून केंद्रावर टीका केली. "केंद्र सरकार उद्योगपतींच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आहे" असं ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: farooq abdullah says lord ram belongs to entire world not only to bjp and rss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app