शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:22 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे. 

ठळक मुद्देफारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोहीवाराणसीत चिटकवले पोस्टर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप

वाराणसी :  गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे. येथील मानवाधिकार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर लावली असल्याचे समजते. दरम्यान, काल फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप करत मानवाधिकार जनशक्ती पार्टीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला होता.  

दरम्यान, फारुख अब्दुला यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यामुळे मानवाधिकार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते चंद्रशेखर सिंह यांनी गुरुवारी दोघांविरोधात देशद्रोहाचा आरोप करत स्थानिक कोर्टात तक्रार दाखल केली आहे.  देशाची एकता आणि अखंडतेविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली. कोर्टानेही  त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर 21 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRishi Kapoorऋषी कपूर