अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:46 IST2025-06-22T21:45:44+5:302025-06-22T21:46:19+5:30

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

farooq abdullah on the america strikes on iran said that i am disappointed that the muslim world is silent | अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”

Farooq Abdullah On America Entry in Israel Iran War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अखेर अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ले केले. यानंतर आता जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर शांतता निर्माण होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चाही केली. यातच या युद्धात रशिया उडी घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे. 

मीडियाशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, तेथील मुस्लिम देश शांतपणे तमाशा पाहत आहेत, याचे मला वाईट वाटते. आज त्यांची ही अवस्था आहे, उद्या इतरांचीही अशीच अवस्था होईल, मी तुम्हाला सांगतो की, आज जे गप्प बसले आहेत, त्यांनाही अमेरिका नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला. त्यांच्यावरही आज ना उद्या अशी वेळ येईल, आज जर जागे झाले नाहीत, तर त्यांच्यावर वेळ येण्याची त्यांनी वाट पाहावी, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
 
तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत

इराण आणि इस्रायल युद्धात ट्रम्प यात हस्तक्षेप करतील, असे वाटले होते. परंतु, तेच आता या युद्धात उतरले आहेत. आधीच अमेरिका रशिया-युक्रेन युद्धात लढत आहे. आता त्यांनी दुसरे युद्ध सुरू केले आहे. याचाच अर्थ हळूहळू तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्या गोष्टी जात आहेत, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला. सर्वाधिक कच्चे तेल तेथूनच आपल्याला मिळते. या युद्धामुळे त्यावरही तीव्र परिणाम होईल. आपल्या अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम पाहायला मिळतील, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी अलीकडेच पाकच्या फिल्ड मार्शल यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. ट्रम्प हे नेमका काय खेळ खेळत आहेत, ते माहिती नाही. एकीकडे हिंदुस्थानलाही हाताशी धरले आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकलाही हाताशी धरले आहे. त्यांना नेमके काय करायचे आहे, याचा काही अंदाज नाही, असे अब्दुल्ला यांनी नमूद केले. 

Web Title: farooq abdullah on the america strikes on iran said that i am disappointed that the muslim world is silent