10 डिसेंबरला टिकरी सीमेवर शेतकरी एकत्र येणार, एमएसपी हमीभावावरून आंदोलन पुकारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 02:49 PM2022-12-08T14:49:35+5:302022-12-08T14:49:54+5:30

11 डिसेंबरला सुद्धा टिकरी सीमेला लागून असलेल्या बहादूरगडमध्ये हजारो शेतकरी जमा होणार आहेत.

farmers will gather at tikri border on december 10 for msp guarantee | 10 डिसेंबरला टिकरी सीमेवर शेतकरी एकत्र येणार, एमएसपी हमीभावावरून आंदोलन पुकारणार!

10 डिसेंबरला टिकरी सीमेवर शेतकरी एकत्र येणार, एमएसपी हमीभावावरून आंदोलन पुकारणार!

Next

चंदीगड : वर्षभरानंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या टिकरी सीमेवर शेतकरी एकत्र येणार आहेत. एमएसपीच्या हमीभावावरून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मशाल मोर्चा 10 डिसेंबरला बहादुरगडच्या जुन्या बसस्थानकावर पोहोचणार आहे. जुन्या बसस्थानकावरून पंजाब, राजस्थान आणि हरयाणातील हजारो शेतकरी पायी चालत मशाल मोर्चा घेऊन टिकरी सीमेवरील शेतकरी आंदोलनस्थळी जातील आणि तेथून नव्या आंदोलनाचा बिगुल वाजवतील.

यावेळी शेतकऱ्यांची मागणी एमएसपी हमी कायदा आणि संपूर्ण कर्जमाफी आहे, असे शेतकरी नेते विकास सीसर यांनी सांगितले. गेल्या वर्षी 11 डिसेंबरपासून शेतकरी दिल्ली सीमा सोडून आपापल्या घरी आणि शेतात परतायला लागले होते. शेतकऱ्यांच्या घरवापसीचे वर्षही पूर्ण होत आहे. 11 डिसेंबरला सुद्धा टिकरी सीमेला लागून असलेल्या बहादूरगडमध्ये हजारो शेतकरी जमा होणार आहेत.

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलन चालवणाऱ्या शेतकरी संघटनांनी ही घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत 10 आणि 11 डिसेंबर रोजी बहादूरगड आणि टिकरी सीमेवर हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती सरकारच्या अडचणीत वाढ करू शकते, कारण शेतकरी नेते शेतकऱ्यांना टिकरी सीमेवर पोहोचण्याचे आवाहन करत आहेत. गेल्या वर्षी 11 डिसेंबरपासून शेतकरी दिल्ली सीमा सोडून आपापल्या घरी आणि शेतात परतायला लागले होते. शेतकऱ्यांच्या घरवापसीलाही वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, 10 डिसेंबर रोजी टिकरी सीमेला लागून असलेल्या बहादूरगडमध्ये हजारो शेतकरी जमा होणार आहेत.

Web Title: farmers will gather at tikri border on december 10 for msp guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी