धक्कादायक! जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणत "त्याने" केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:34 PM2021-01-20T12:34:55+5:302021-01-20T12:38:01+5:30

Farmers Protests And Suicide : कडाक्याच्या थंडीत अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

farmers protest at tikri border farmer swallow poison died in hospital during treatment | धक्कादायक! जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणत "त्याने" केली आत्महत्या 

धक्कादायक! जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणत "त्याने" केली आत्महत्या 

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विष घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टिकरी बॉर्डरवर मंगळवारी एका शेतकऱ्याने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी त्याल तातडीने दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. जयभगवान राणा असं या शेतकऱ्याचं नाव असून ते हरियाणच्या रोहतकचे रहिवासी होते. ते गेल्या कित्येक दिवसांपासून ते आंदोलनात सहभागी झाले होते. विषारी पदार्थ खाल्ल्याअगोदर त्यांनी एक पत्र देखील लिहीलं आहे. जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणूनच मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं शेतकऱ्याने म्हटलं आहे. 

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शेतकऱ्याला उलटी झाली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने एक पत्र देखील लिहिलं आहे. ज्यामध्ये त्याने शेतकऱ्यांचा हा प्रश्न कसा सोडवायचा हे देखील सांगितलं आहे. "देशातील सर्व राज्यातून दोन-दोन शेतकरी नेत्यांना दिल्लीला बोलवा आणि सरकारसोबत आणि मीडियासमोर सर्व शेतकरी नेत्यांना विचारा की ते कृषी कायद्याच्या का विरोधात आहेत. जर कायद्याविरोधात जास्त राज्य असतील तर सरकारने कायदा मागे घ्यावा. मात्र जर कायद्यासाठी जास्त राज्य असतील तर शेतकऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आंदोलन संपवावं आणि घरी जावं" असं शेतकऱ्याने पत्रात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

...म्हणून "या" गावात BJP आणि JJP नेत्यांना नो एंट्री, शेतकऱ्यांनी लावले बॅनर

एका गावात बीजेपी आणि जेजेपी नेत्यांना नो एंट्री आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील कनीपला गावात जननायक जनता पार्टी (JJP) आणि भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) बॅनर लावण्यात आले आहेत. जेजेपी आणि बीजेपी नेत्यांनी गावात येऊ नये असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. जर नेते या गावात आले, तर त्यांच्या परिस्थितीसाठी ते स्वत: जबाबदार असल्याचं देखील म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही पार्टीचा नेता असेल आणि जर तो शेतकऱ्यांना विरोध करत असेल तर त्याला गावात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. शेतकरी नेत्यांवर नाराज असल्याने त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: farmers protest at tikri border farmer swallow poison died in hospital during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.