शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

Farmers protest : मोदी पहिल्यांदाच घेतायत मंत्र्यांची बैठक; शेतकरी म्हणाले - 'आज आर या पार'ची लढाई

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 5, 2020 12:21 IST

मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित आहेत.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 10वा आणि महत्वाचा दिवस आहे. दुपारी 2 वाजता शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. मात्र, यापूर्वी दोन मोठ्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना समजावण्यासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी कृषी मंत्री नरेंद्र सिंह म्हणाले, 'शेतकरी सकारात्मक विचार करून आंदोलन संपवतील,' अशी आशा आहे.

शेतकरी म्हणाले, आज केवळ कायदे रद्द करण्याचीच चर्चा -आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे, सरकार सातत्याने पुढची तारीख देत आहे. यामुळे, आज चर्चेचा अखेरचा दिवस असल्याचे सर्व संघटनांनी निश्चित केले आहे. किसान संयुक्त मोर्चाचे प्रमुख रामपाल सिंह म्हणाले, आज आर अथवा पारची लढाई करूनच येणार. रोज-रोज बैठक होणार नाही. आजच्या बैठकीत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही. केवळ कायदे रद्द करण्यासाठीच चर्चा होईल.

सुधारणांसाठी केंद्र सरकार राजी, पण... -शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात गुरुवारी चौथी बैठक झाली. ही चर्चा 7 तास चालली. यानंतर आंदोलन सध्या तरी थांबणार नाही, हे स्पष्ट झाले होते. क्रांतिकारी किसान युनियनचे नेते दर्शनपाल यांनी म्हटले आहे, की केंद्र कायद्यांतील काही सुधारणांवर सहमत आहे. मात्र, आम्ही नाही. आम्ही त्यांना सांगितले, की संपूर्ण कायद्यातच तृटी आहेत. त्यामुळे हे कायदे परत घ्यावेत.

8 डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा -शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन 10 दिवशीही सुरूच आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून याचाच भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे. 

सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेडस आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांनी संधी मिळताच त्यांनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करुन शेतकऱ्यांना थांबवले.  शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी (एमएसपी) स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा