शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Farmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 5:42 PM

Farmers lathicharge : हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले.

ठळक मुद्देहरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी पानिपत आणि हिसार या शहरांमध्ये 500 खाटांची क्षमता असलेल्या दोन कोरोना रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले.

हिसार : मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी हरयाणात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. (Police Lathicharge On Farmers Who Were Protesting Against CM Manohar Lal Khattar)

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी पानिपत आणि हिसार या शहरांमध्ये 500 खाटांची क्षमता असलेल्या दोन कोरोना रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले. हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते, पण शेतकरी थांबले नाहीत. ते मुख्यमंत्र्याच्या दिशेने जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

अनेक शेतकरी जखमीशेतकऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि मोठ्या संख्येने रुग्णालयाकडे कूच करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरूग्राममध्ये दोन रुग्णालयांचे उद्धाटनमुख्यमंत्र्यांनी गुरुग्राममध्ये आणखी दोन रुग्णालयांचे - 100 खाटांचे फील्ड रुग्णालय आणि 300 खाटांचे कोरोना केअर सेंटरचे उद्धाटन केले. दरम्यान, पानिपत येथे रिफायनरीजवळ तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे नाव गुरु तेग बहादूर संजीवनी कोविड रुग्णालय ठेवले आहे. या रुग्णालयासाठी 25 डॉक्टर आणि 150 पॅरामेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना माघारी जाण्याचे आवाहनदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना साथीच्या रोगामुळे घरी परतण्यासाठी आणि कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की परिस्थिती सामान्य राहिल्यास शेतकरी आंदोलन करू शकतात.

26 मे रोजी काळा दिवस साजरा करणार मोदी सरकारने आणलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आता 26 मे रोजी दिल्ली सीमेवर काळा दिवस साजरा करण्याची तयारी करत आहेत. या दिवशी शेतकरी आंदोलनाला 6 महिनेही पूर्ण होत आहेत. यामुळे शेतकरी संघटनांनी या दिवशी शेतकऱ्यांसोबत काळा दिवस साजरा करण्याविषयी तसेच सरकारविरोधात रोष व्यक्त करण्याविषयी चर्चा केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHaryanaहरयाणाFarmers Protestशेतकरी आंदोलन