शेतकऱ्यांचा खर्च वाढणार; खते महागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 07:54 IST2023-09-13T07:54:31+5:302023-09-13T07:54:51+5:30
Fertilizers Price: रशियाच्या कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते भारताला सवलतीच्या किमतीत देणे बंद केले आहे. जागतिक स्तरावर खतपुरवठ्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे रशियाच्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांचा खर्च वाढणार; खते महागणार?
नवी दिल्ली - रशियाच्या कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते भारताला सवलतीच्या किमतीत देणे बंद केले आहे. जागतिक स्तरावर खतपुरवठ्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे रशियाच्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला.
बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियन कंपन्यांनी घेतली. त्यामुळे भारतात खतांच्या किमती तसेच खतांवरील अनुदानाचा बोजा वाढू शकतो. जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली.
खतेनिर्मिती क्षेत्रातील एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यापुढे रशियाच्या कंपन्यांकडून खते सवलतीच्या किमतीत मिळणार नाहीत. २०२२-२३ या वित्तीय वर्षात भारताने रशियाकडून ४.३५ टन खते आयात केली. या आयातीचे प्रमाण २४६ टक्के वाढले होते. रशियाने गेल्यावर्षी आपल्या खतांची मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे खतांच्या निर्यातीमध्ये चीन, इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता.