शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 16:18 IST

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? टिकैत म्हणाले...

ठळक मुद्देटिकैत यांनी सरकारकडे चर्चेची इच्छा व्यक्त केल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता बॉर्डरवर सकाळपासून नेते मंडळींची वर्दळ सुरू आहे.राकेश टिकैत यांनी अरविंद केजरीवालांचे मानले आभार

नवी दिल्ली - गाझीपूर बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉर्डरवर सकाळपासून नेते मंडळींची वर्दळ सुरू आहे. अशात टिकैत यांनी सरकारकडे चर्चेची इच्छा व्यक्त केल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर टिकैत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही आभार मानले आहेत.

भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे.

सरकारी नोकरीवर लाथ ते ४४ वेळा जेलवारी; मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? यावर टिकैत म्हणाले, नाही नाही, आम्ही पुन्हा सरकारशी चर्चा करू. टिकैत यांनी दिलेल्या या वक्तव्यानंतर, आता सरकारकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचारनंतर आंदोलनात अनेक चढ-उतार बघायला मिळाले आहेत. खरे तर यापूर्वी सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात कृषी कायद्यांवर तब्बल 11 वेळा चर्चा झाली आहे. मात्र, या सर्वच चर्चा निष्फळ ठरल्या.

राकेश टिकैत यांनी अरविंद केजरीवालांचे मानले आभार -टिकैत म्हणाले, आम्ही प्रशासनाला सांगत आहोत, की सर्व सुविधा सुरू करा. आमचा संघर्ष केंद्र सरकारबरोबर आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करू. आंदोलन पूर्ण झाल्यानंतर शेतकरी सन्मानाने घरी जातील. आम्ही अरविंद केजरीवाल यांचे आभार मानतो. ही सर्वसामान्य नागरिकांची लढाई आहे.

Farmer Protest: ...अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर

उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांना नोटिसाकृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शांततेचा भंग होण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत २ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवालyogi adityanathयोगी आदित्यनाथ