शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:05 IST

farmer leader datar singh dies due to heart attack while speaking against farm law: शेतकरी नेत्याच्या मृत्यूनं हळहळ; व्यासपीठावर भाषणानंतर घेतला अखेरचा श्वास

अमृतसर: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (farm laws) गेल्या अडीच महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन (farmers protest) करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. या कालावधीत कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे.शेतकरी कायदे मागे घेण्याची मागणी असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी : रामदास आठवलेअमृतसरमध्ये कीर्ती किसान युनियनचे प्रधान मास्टर दातार सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. त्यांनी एका सभेला संबोधित केलं. भाषणाचा समारोप केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी ते व्यासपीठावरच होते. उपस्थितांनी सिंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलनअमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक उजागर सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमाला दातार सिंग उपस्थित होते. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलचे विचार त्यांनी मांडले. अलविदा, माझी वेळ संपत आलीय, असं म्हणत त्यांनी भाषणाचा शेवट केला. ते खुर्चीत बसले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.गेल्या अनेक दिवसांपासून दातार सिंग दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत होते. तीनच दिवसांपूर्वी ते तिथून अमृतसरला परतले. कार्यक्रमासाठी त्यांनी अमृतसर गाठलं होतं. या कार्यक्रमात भाषणानंतर सिंग यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिंग यांच्या कुटुंबावर आणि त्यांना मानणाऱ्या शेकडो व्यक्तींवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन