शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

भारीच! 200 रुपये भाडयावर घेतलेल्या जमिनीत 60 लाखांचा हिरा सापडला अन् शेतकरी लखपती झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 3:43 PM

Farmer finds Diamond : एका गरीब शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे.

नवी दिल्ली - कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. एका गरीब शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. 200 रुपये भाडयावर घेतलेल्या जमिनीत शेतकऱ्याला तब्बल 60 लाखांचा हिरा सापडला आहे. लखन यादव असं हिरा सापडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखन यादव या शेतकऱ्याने पन्नामध्ये 200 रुपये भाडयावर 10 बाय 10 जमिनीचा एक छोटा तुकडा घेतला होता. तिथे खोदकाम करताना त्याला 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. खाणीत सापडलेला हिरा लिलावामध्ये 60.6 लाख रुपयांना विकला गेला आहे. "हिऱ्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. हिरा सापडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही" असं लखन यादव याने म्हटलं आहे. 

पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध

लखनने मिळालेल्या पैशातून आपल्या चार मुलांना चांगले शिक्षण देण्याचा विचार केला आहे. माझे शिक्षण झालेले नाही. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. 

खाणीत सापडले मौल्यवान हिरे अन् क्षणातच मजूर झाले मालामाल

हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना काही दिवसांपूर्वी  मौल्यवान हिरे सापडले होते. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा एक हिरा मिळाला होता. पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले आहे. हिऱ्याची योग्य किंमत अधिकाऱ्यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरी