शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 9:50 AM

काही शेतकरी संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूने आहेत, तर काही संघटनांना इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवायचे आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची(Farm Laws Repealed) घोषणा केली होती. त्यानंतर हिवाळी अदिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे कायदे परत घेणारे विधेयक मंजूर झाले. पण अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन संपलेले नाही. यातच शेतकरी आंदोलनात फूट पडल्याच्या बातम्याही येत आहेत. आता आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलन मागे घेणे आणि MSP समितीच्या स्थापनेवर चर्चा होणार आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या विजयानंतर संप मागे घेण्याच्या बाजूने आहेत. तर अनेक शेतकरी संघटनांना एमएसपी कायदा आणि खटले मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी संप सुरुच ठेवायचा आहे. माघार घेणारे पक्ष एकमत घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रणनीती निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक होत आहे.

अनेक संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूनेकाल झालेल्या पंजाबमधील 32 संघटनांच्या बैठकीत संसदेतून कृषीविषयक कायदे मागे घेतल्याने आंदोलनाचा विजय झाला यावर एकमत झाले. तसेच, एमएसपी कायदा बनवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल, त्यामुळे सरकारला मुदत देऊन संप संपवावा, अशी अनेक संघटनांची मागणी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांनी संप मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत थांबण्याच्या बाजूने आहेत.

केंद्राकडून प्रमुख मागण्या मंजूर ?

कृषी कायद्याला सर्वप्रथम पंजाबमधील शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यांच्या आवाहनावर पंजाब तसेच हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकरीही सामील झाले. ही चळवळ हळूहळू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरली. आकडेवारी दर्शवते की पंजाब आणि हरियाणामध्ये MSP वर देशात सर्वाधिक खरेदी होते, त्यामुळे त्यांची MSP साठी कोणतीही मोठी मागणी नव्हती. पंजाबमधील शेतक-यांचे प्राधान्य हे तीन कृषी कायदे मागे घेणे आणि गवत जाळण्यावर दंडात्मक कारवाई न करणे हे होते, केंद्र सरकारने दोन्ही मागण्या पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी