शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका

By मोरेश्वर येरम | Updated: December 5, 2020 17:33 IST

सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज पाचवी बैठककृषी कायदे रद्द करण्याचा भूमिकेवर शेतकरी ठामकृषी कायदे रद्द करत असल्याचं सरकारने लेखी द्यावं, शेतकऱ्यांची भूमिका

नवी दिल्लीकृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी शिगेला पोहोचला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचवी बैठक सुरू आहे. या बैठकीतही सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यातील संशोधनाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारचा हा संशोधनाबाबतचा प्रस्ताव देखील साफ फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत. 

"आतापर्यंत खूप चर्चा झाली. आम्हाला आता सरकारसोबत कोणतीही बैठक नको, लेखी स्वरुपात उत्तर हवंय.", अशी भूमिका शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तर शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनांचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित आहेत. 

दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या या बैठकीआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची घोषणा केलेली आहे. याशिवाय, आज सरकारने कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली नाही, तर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटशेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबतची आजची बैठकी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नरेंद्रसिंह तोमर आणि पियूष गोयल हे सरकारच्यावतीनं शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्यासाठी विज्ञान भवनात दाखल झाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी