मूर्खपणा! कोरोना रूग्णाचा ऑक्सीजन मास्क काढून पूजा करू लागल्या महिला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:59 PM2021-05-12T15:59:55+5:302021-05-12T16:00:37+5:30

Coronavirus News : धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही महिलांचा हा प्रताप सुरू असताना त्यांच्या रूग्णाचा मृत्यू होतो. नंतर दोन्ही महिलांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.

Family member removed oxygen cylinder performed Puja Kanpur Uttar Pradesh, patient died | मूर्खपणा! कोरोना रूग्णाचा ऑक्सीजन मास्क काढून पूजा करू लागल्या महिला आणि मग....

मूर्खपणा! कोरोना रूग्णाचा ऑक्सीजन मास्क काढून पूजा करू लागल्या महिला आणि मग....

googlenewsNext

यूपीच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये पूजा-पाठ करून रूग्णाचा जीव धोक्यात टाकतांना दिसले. ही घटना कानपूरच्या हॅलट हॉस्पिटलच्या कोविड वार्डातील सांगितली जात आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, कोविड वार्डात दोन महिला त्यांच्या कोविड रूग्णाचं ऑक्सीजन काढतात आणि पूजा सुरू करतात. 

या दोन महिलांनी रूणाच्या बेडला वेढा दिला आणि पूजा-पाठ सुरू केला. त्या काही मंत्र म्हणताना दिसत आहेत. संपूर्ण वार्डात दोन्ही महिलांचा मंत्र जपाचा आवाज फिरतो. तेथीलच कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल केला. यादरम्यान या महिलांना या गोष्टीची जराही चिंता नाही की, त्यांनाही कोरोना होऊ शकतो आणि तेथून बाहेर  पडल्यावर दुसऱ्यांना कोरोना देतील. 

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही महिलांचा हा प्रताप सुरू असताना त्यांच्या रूग्णाचा मृत्यू होतो. नंतर दोन्ही महिलांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. वार्डातील डॉक्टरवर त्यांनी बेजबाबदारपणाचा आरोप लावला. असे सांगितले जात आहे की, या दोन्ही महिला जबरदस्ती कोविड वार्डात शिरल्या होत्या. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी काही ऐकलं नाही. (हे पण वाचा : अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....)

याप्रकरणी जीएसवीएम मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉक्टर आरबी कमल यांनी सांगितले की, हा व्हिडीओ २२ एप्रिलचा आहे. रूग्णाला वार्ड नंबर चारमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर अलोक वर्मा त्यांच्यावर उपचार करत होते. रात्रीच्या वेळी दोन महिला त्यांच्या रूग्णाला भेटण्यासाठी जबरदस्ती वार्डात आल्या. त्या नर्सला म्हणाल्या की, रूग्ण तुमच्या उपचारांनी बरा होणार नाही. त्याल भूतबाधा झाली आहे. त्यानंतर महिलेने बेडवर पूजा सुरू केली.

हे करत असताना महिलांनी रूग्णाची ऑक्सीजनची नळीही काढली. हॉस्पिटल स्टाफने रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरच भडकल्या. काही वेळाने रूग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही महिला बराचवेळ हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत राहिल्या. दुसऱ्या दिवशी प्रोटोकॉलनुसार, रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: Family member removed oxygen cylinder performed Puja Kanpur Uttar Pradesh, patient died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.