शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

लाखो स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा खोट्या बातम्यांमुळे;माध्यमांनी जबाबदारीने वागण्याची सुप्रीम कोर्टाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 12:31 AM

परिणामी त्यांचे अतोनात हाल झाले व त्यांच्यापैकी काहींना हकनाक प्राणही गमवावा लागला, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने तीन आठवड्यांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात तो तीन महिन्यांपर्यंत सुरू राहील, अशा आशयाच्या खोट्या बातम्या व अफवांचे देशभर पेव फुटणे हे परराज्यांमध्ये मोलमजुुरी करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळेच ते जीव धोक्यात घालून शेकडो कि.मी. चालत घरी जायला निघाले.

परिणामी त्यांचे अतोनात हाल झाले व त्यांच्यापैकी काहींना हकनाक प्राणही गमवावा लागला, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. याविषयी केलेल्या दोन जनहित याचिकांवर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने दिलेले आठपानी आदेशवजा निकालपत्र मंगळवारी रात्री न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले.

देशावर घोर आपत्ती आलेली असताना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांतून पसरलेल्या खोट्या बातम्या व अफवांमुळे उडालेला हाहाकार मूळ आपत्तीएवढाच गंभीर असल्याने तो दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. म्हणून सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायद्यान्वये याचा वेळच्या वेळी व कठोरपणे बंदोबस्त करायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले.

माध्यमांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही; परंतु त्यांनी हे स्वातंत्र्य उपभोगताना ज्यायोगे लोकांमध्ये सर्वदूर घबराट पसरेल अशा सांगोवांगी माहितीवर आधारित बातम्या प्रसारित होण्याचे टाळून आपल्या जबाबदारीचे गांभीर्याने भान ठेवावे. महामारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारची साधक-बाधक चर्चा जरूर करावी, पण त्याचबरोबर सरकारकडून दिल्या जाणाºया अधिकृत माहितीसही ठळकपणे स्थान द्यावे. यासाठी सर्व माध्यमांतून एक दैनंदिन बुलेटिन काढण्याची व्यवस्था सरकार करीत आहे. माध्यमांनी त्याचा जरूर उपयोग करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्देशानुार माध्यम सूचना विभागाने बुधवारी कोविड-१९ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी बुधवारी दैनंदिन वार्तापत्र जारी केले.

खोट्या बातम्या विषाणूंहून घातक'

खोट्या बातम्या व अफवांमुळे कसा भयंकर हाहाकार होऊ शकतो याचा संदर्भ देताना न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. तेद्रॉस अ‍ॅधेनॉम घेब्रेयेसस यांचे एक ताजे वक्तव्य उद््धृत केले. ते असे, ‘आपण सध्या फक्त एका साथीलाच नव्हे, तर त्यासंबंधात पसरविल्या जाणाºया (चुकीच्या) माहितीच्या महापुरालाही सामोरे जात आहोत. खोट्या बातम्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने व सहजपणे पसरतात व त्या विषाणूंएवढ्याच घातक असतात.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMediaमाध्यमे