False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:02 IST2025-06-21T11:58:55+5:302025-06-21T12:02:03+5:30

लखनौच्या विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

False Gangrape Case: UP Court Awards 7.5 Yr Jail Term To Woman, Describes Accused As 'Most Lucky Survivors' | False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

डॉ.खुशालचंद बाहेती 
लोकमत न्यूज नेटवर्क 

लखनौ : लखनौच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णयात एका २४ वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा व २.१ लाखांचा दंडही ठोठावला आहे. रेखा आणि राजेशचे प्रेमसंबंध होते. नात्यात कटुतेनंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमारवर बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत  आरोप करीत एफआयआर दाखल केला.पोलिसांनी तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला होता. 

मदतनिधी परत वसूल करा
रेखाने पोलिसांच्या या अहवालाला विरोध केला. खटला चालविण्यात आला व न्यायालयाने राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता तर केलीच उलट रेखाविरुद्ध कलम १८२ (लोकसेवकाला खोटी माहिती देणे) व २११ (खोटा गुन्हा दाखल करणे) अंतर्गत दोषी ठरवले. लखनौच्या विशेष न्यायालयाचे न्या. विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी रेखाला साडेसात वर्षांचा तुरुंगवास व २.१ लाख दंडाची शिक्षा दिली. रेखाने एससी, एसटी कायद्यांतर्गत मिळवलेला मदतनिधी परत वसूल करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एससी-एसटी कायदा, पॉक्सो व इतर संवेदनशील कायद्यांचा गैरवापर केला गेला तर जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल. 

Web Title: False Gangrape Case: UP Court Awards 7.5 Yr Jail Term To Woman, Describes Accused As 'Most Lucky Survivors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.