शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

धक्कादायक! यू ट्युब पाहून आठवी पास बनवत होता दोन हजारांच्या बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 4:06 PM

एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त केलेल्या छापेमारीत बनावट नोटा बनवणाऱ्या एका मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या आहेत.

नवी दिल्लीः एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त केलेल्या छापेमारीत बनावट नोटा बनवणाऱ्या एक मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात कासिम हा यू ट्युबवरचे व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करत असल्याचं समोर आलं आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी त्यानं यू ट्युबवर अशा प्रकारचे व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली आणि हा गोरखधंदा सुरू केला. त्यानं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मुलाला हाताशी घेतले. त्यानंतर कासिम अन् मुख्याध्यापकांचा मुलगा वसिम यांनी मिळून 1.20 कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या बनावट नोटा छापल्या. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.पुन्हाना गावातील सिंगर निवासी कासिम फजर(44) आठवी पास आहेत. कासिमला वसिमच्या वडिलांनीच आठवीपर्यंत शिकवलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कासिम अशिक्षित असूनही कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतो. अशाच प्रकारे त्यानं यू ट्युबवर नकली नोटा कशा पद्धतीनं छापल्या जाऊ शकतात, याचा अभ्यास केला. व्हिडीओ पाहून पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानं बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू केला. प्रिंटरच्या साहाय्यानं तो बनावट नोटा छापत होता. त्यानं या बनावट नोटा अनेक ठिकाणी खपवल्या आहेत. पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्याचा नेटवर्कचा थांगपत्ता लावला जात आहे.दुसरीकडे पोलिसांनी 29 मे रोजी सोहना रोडवर एनआयए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 1.20 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तसेच दोन आरोपींना अटकही केली होती. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस तपासात हे सर्व उघड झालं आहे. ते आरोपी या बनावट नोटा मेवातमधल्या घरातच छापत होते. नेपाळमार्गे पाकिस्तानतून त्यांना पेपर आणि शाही मिळत असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :MONEYपैसा