बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:12 IST2025-07-26T08:54:35+5:302025-07-26T09:12:25+5:30

गाझियाबादमध्ये बनावट दूतावास चालवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हर्षवर्धन जैनने १० वर्षांत १६२ वेळा परदेश प्रवास केला आहे.

Fake ambassador traveled abroad 162 times in 10 years; visited this country the most | बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला

बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला

काही दिवसापूर्वी गाझियाबादमध्ये एकाने चक्क बनावट दूतावास उघडून घोळ केल्याचे उघड झाले . त्याच्याकडून ४४ लाख रुपये, राजनैतिक पासपोर्ट, ३४ शिक्के, वाहने, पासपोर्ट, घड्याळे जप्त करण्यात आली. हर्षवर्धन जैन असे त्याचे नाव असून, त्याला गजाआड करण्यात आले. त्याची आता चौकशी सुरू आहे. रोज नवीन खुलासे होत आहेत. जैन १० वर्षांत १६२ वेळा परदेशात गेल्याचे समोर आले. त्याने तिथे कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांचा वापर ब्रोकरेजसाठी केला. 

युएलासाठी सर्वाधिक ५४ वेळा आणि युकेलासाठी २२ वेळा परदेशात प्रवास केला. आतापर्यंत २५ कंपन्या आणि २० बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली आहे. तो हवाला व्यवसाय करायचा असा दावा अधिकाऱ्यांचा आहे.

पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार

अनेक मोठ्या लोकांना भेटला

मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या व्यवसायात तांत्रिक गुरु चंद्रास्वामीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा वापर करत होता. या नेटवर्कद्वारेच त्याने परदेशात खोलवर मुळे रोवली होती. तांत्रिक गुरुने त्याची ओळख आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्कर अदनान खाशोगीशीही करून दिली होती. याशिवाय, तांत्रिक गुरुच्या माध्यमातून तो परदेशात अनेक मोठ्या लोकांना भेटला. एसटीएफ पथके त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांची माहिती देखील गोळा करत आहेत.

लंडनमध्ये अनेक कंपन्या तयार केल्या

२००० मध्ये हर्षवर्धन जैन चंद्रास्वामींच्या संपर्कात आला. चंद्रास्वामींनी हर्षवर्धनची ओळख लंडनमध्ये अदनान आणि एहसानशी करून दिली. एहसानसोबत हर्षवर्धनने लंडनमध्ये डझनभराहून अधिक कंपन्या स्थापन केल्या, त्या ब्रोकरेजसाठी वापरल्या जात होत्या. २००६ मध्ये हर्षवर्धन दुबईत स्थायिक झाला. दुबईमध्ये हर्षवर्धनची भेट शफीक आणि इब्राहिमशी झाली. शफीक आणि इब्राहिमसोबत हर्षवर्धनने दुबईत अनेक कंपन्या स्थापन केल्या. याशिवाय त्याने इतर देशांमध्येही कंपन्या स्थापन केल्या.

५४ वेळा युएईला, २२ वेळा युकेचा प्रवास

एसटीएफ अधिकाऱ्यांनी हर्षवर्धनच्या परदेश दौऱ्यांबाबतही माहिती गोळा केली आहे. पासपोर्टच्या मिळालेल्या नोंदींनुसार, २००५ ते २०१५ या १० वर्षांत त्याने १६२ वेळा परदेश प्रवास केल्याचे उघड झाले आहे. या काळात त्याने १९ देशांना भेट दिली. तो युएईला सर्वाधिक वेळा, म्हणजे ५४ वेळा गेला. याशिवाय, तो २२ वेळा युकेला गेला.

Web Title: Fake ambassador traveled abroad 162 times in 10 years; visited this country the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.