शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 12:45 IST

Fact Check giving free laptops by government is going viral : 'केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार' असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत असतात. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाही तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच दरम्यान आता 'केंद्र सरकारकडून लोकांना फ्री लॅपटॉप मिळणार' असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. अनेकांना ही गोष्ट खरी वाटत आहे. 

WhatsApp वर लोकांना पंतप्रधान लॅपटॉप वितरण योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे मेसेज येत आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेसेजखाली एक फेक लिंकही देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण या लिंकवर क्लिक करुन अडचणीत येऊ शकतात. केंद्र सरकारकडून लॅपटॉप फ्री देण्याची अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही. लोकांचा स्मार्टफोन हॅक करून त्यातील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने काही फ्रॉड करणाऱ्यांनी हे फेक मेसेज लोकांना पाठवायला सुरुवात केलेली आहे. 

लोकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा 

PIB Fact Check ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. सरकारने अशी योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच लोकांना सावध देखील केलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नावे अशाप्रकारे बनावट मेसेज बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. असा मेसेज आल्यास तुम्ही फसू नका असं म्हटलं आहे. 

खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न 

कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल