शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Fact Check : 1 एप्रिलपासून खरेच रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:48 PM

resumption of full passenger train services Fact Check: १ एप्रिलपासून सर्व पँसेंजर गाड्या धावण्यास सुरुवात होईल. ढील महिन्यात असलेल्या होळीमुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी असेल. त्यातच कोरोनाची सध्याची स्थिती पाहता रेल्वेसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. आता पीएमओकडून लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे वृत्त पसरले होते.

गतवर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर टप्प्याटप्प्याने काही विशेष मेल,एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी देशातील रेल्वेसेवा अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. यातच आज रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची बातमी आली. यामध्ये महिना आणि तारीखही देण्यात आली. परंतू ती बातमी खोटी असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (Indian Railways clarifies about resumption of full passenger train services from April)

पूर्ण क्षमतेने प्रवासी रेल्वे सेवा एप्रिलमध्ये सुरु करण्यात येणार आहे, अशी बातमी आली आहे. ही बातमी खोटी आहे. अद्याप अशा प्रकारची कोणतीही तारीख ठरविण्यात आलेली नाही. रेल्वे टप्प्या टप्प्याने रेल्वे सेवांची संख्या वाढवत आहे. सध्या 65 टक्क्यांहून अधिक रेल्वे धावत आहेत. तर 250 रेल्वे सेवा एकट्या जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हळूहळू आणखी वाढ करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अपवांना बळी पडू नये. अशाप्रकारचे निर्णय जेव्हा घेतले जातील तेव्हा अधिक़ृतरित्या सर्वांना कळविले जाईल, असेही रेल्वेने म्हटले आहे. 

१ एप्रिलपासून सर्व पँसेंजर गाड्या धावण्यास सुरुवात होईल अशी अफवा उठली होती. यामध्ये सामान्य, शताब्दी आणि राजधानीसह सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्यांचा समावेश असेल. पुढील महिन्यात असलेल्या होळीमुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी असेल. त्यातच कोरोनाची सध्याची स्थिती पाहता रेल्वेसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. आता पीएमओकडून लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असेही यामध्ये म्हटले होते. परंतू ते सारे खोटे आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे