मुंबई, दिल्लीसह सहा शहरांत घातपाताचा अतिरेक्यांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 06:37 IST2019-10-04T06:36:57+5:302019-10-04T06:37:22+5:30
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.

मुंबई, दिल्लीसह सहा शहरांत घातपाताचा अतिरेक्यांचा प्रयत्न
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांतील पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु तसेच कोलकाता यांसह अनेक शहरात हल्ले घडवण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट आहे. सहाहून अधिक दहशतवाद्यांनी घुसघोरी केल्याची माहिती आहे.