शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईवर रानभाज्यांचा उतारा

By admin | Updated: July 19, 2016 00:18 IST

आदिवासी बाजारपेठेत विशेष मागणी

 पेठ : एकीकडे शहरी भागात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडत प्रश्नावरून बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असताना गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले असताना पेठच्या आदिवासी भागात याची फारशी झळ बसलेली दिसून आलेली नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने सध्या या भागात रानभाज्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत.पहिल्या पावसाबरोबर येणाऱ्या कवळीच्या भाजीने खरे तर रानभाज्यांची सुरुवात होत असते. अवघ्या आठवडाभर टिकणारी ही भाजी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. भल्या पहाटे नागरिक जंगलात जाऊन भाज्या आणून पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे आदि मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. रासायनिक खते व बियाणांनी पिकवलेल्या भाज्यांकडे पावसाळा भर आदिवासी भागात पाठ फिरवली जाते. कोणत्याही प्रकारचा रासायनिक टच नसलेल्या नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या या भाज्यांना सद्या बाजारात चांगलीच मागणी आहे. (वार्ताहर)