शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 9:45 AM

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देशरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासणीमधून धक्कादायक माहिती समोरशरजीलने सीएए आणि एनआरसीविरोधात पत्रके छापली होती, तसेच त्यामध्ये दिशाभूल करणारे आणि  भीती पसरवणारा उल्लेखअलीगड आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील चिथावणीखोर भाषणांप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत

नवी दिल्ली - सीएए आणि एनआरसीला विरोध करताना प्रक्षोभक भाषण देणाऱ्या शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासणीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरजीलने सीएए आणि एनआरसीविरोधात पत्रके छापली होती, तसेच त्यामध्ये दिशाभूल करणारे आणि  भीती पसरवणारा उल्लेख होता. तसेच ही पत्रके त्याने अनेक मशिदींमध्ये वाटली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली आहे. शरजीलच्या बिहारमधील जहानाबाद येथील घरातून आणि दिल्लीतील वसंत कुंज येथे असलेल्या फ्लॅटमधून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सीएएविरोधातील पोस्टर जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील न्यायालयाने शरजीलला पोलीस कोठडीत घेण्यासाठी शुक्रवारी वॉरंट जारी केले आहे. 

 शरजील इमाम याला देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली होती. दरम्यान, अलीगड आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील चिथावणीखोर भाषणांप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान वसंत कुंज येथील शरजीलच्या भाड्याच्या फ्लॅटमधून एक लॅपटॉप आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले. 

देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन

JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा दरम्यान, शरजीलने मशिदींमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधाती पत्रके वाटली होती. ज्यामध्ये दिशाभूल करणारे आणि भीती निर्माण करणारे उल्लेख होते. तसेच पोलिसांनी याच्या पत्रकाच्या प्रती जप्त केल्या आहेत. तसेच या प्रतींची झेरॉक्स ज्या दुकानातून काढण्यात आली त्याचीही ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारतPoliceपोलिस