शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:02 PM

पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे.

ठळक मुद्दे मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपा सलग चौथ्यांदा सत्ता राखेल, असा अंदाज इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया आणि रिपब्लिक- सीवोटर राज्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचा अंदाज

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध होऊ लागले आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपा सलग चौथ्यांदा सत्ता राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया आणि रिपब्लिक- सीवोटर राज्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  टाइम्स नाऊ-सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला 126 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 89, बसपाला 7 आणि इतरांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर  इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यातून भाजपाची सत्ता जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 104 ते 122 तर भाजपाला 102 ते 120 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.रिपब्लिक- सीवोटरनेही मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्तेतून एक्झिट होईल, असा अंदाज वर्तलवला आहे. या पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 110 ते 126 तर भाजपाला 90 ते 106 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर इथे इतरांना 6 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

एबीपी न्यूज-लोकनीतीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाचा दारुण पराभव होणार असून, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 126, तर भाजपाला केवळ 94 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस