शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या राजकारणात पुढच्या १० दिवसांत खळबळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:47 IST

National Politics: प्रतिष्ठेच्या जी-२० संमेलनाचे शानदार आयोजन पार पडताच देशाच्या राजकारणात कोणत्या उलथापालथी होणार याकडे राजधानीत चर्चेचा ओघ वळला आहे.

- सुनील चावके नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या जी-२० संमेलनाचे शानदार आयोजन पार पडताच देशाच्या राजकारणात कोणत्या उलथापालथी होणार याकडे राजधानीत चर्चेचा ओघ वळला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत पुढच्या दहा दिवसांत राष्ट्रीय राजकारणात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दोन वेळा मुदतवाढ मिळालेले ईडीचे संचालक संजय मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचे शेवटचे चार दिवस उरले असून त्यात ‘इंडिया’ आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर संकटे कोसळण्याची भाकिते वर्तविली जात आहेत. संजय मिश्रा १५ सप्टेंबर रोजी निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना ईडी आणि सीबीआयदरम्यान समन्वय साधण्यासाठी सीआयओच्या (मुख्य तपास अधिकारी) पदावर नियुक्त करण्याचा सरकारचा इरादा असल्याची चर्चा आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १५ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. केंद्र सरकारने येत्या सोमवारपासून बोलविलेल्या संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीला धक्का देण्यासाठी या अधिवेशनात अनपेक्षित अशी कोणती विधेयके पारित होणार याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. 

कोणत्या नेत्यांवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता?केंद्र ईडीच्या रडारवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, शिवसेना-ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आमदार कन्या कविता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे भाचे अभिषेक बनर्जी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नावे असून संजय मिश्रा यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई होण्याचे शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाCBIगुन्हा अन्वेषण विभाग