शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये कपात; दरवाढ तूर्त टळली, देशात लॉकडाऊन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 06:18 IST

सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर; इंधन निर्यातीवर पुन्हा ‘विंडफॉल टॅक्स’ लागू

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असताना, केंद्र सरकारनेपेट्रोलडिझेलवरील उत्पादन शुल्कात गुरुवारी प्रतिलिटर १० रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे इंधनाच्या किरकोळ विक्री दरातील संभाव्य वाढ टळली असून, सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर राहिल्या. इंधनाची उपलब्धता राहावी यासाठी सरकारने इंधन निर्यातीवर ‘विंडफॉल टॅक्स’ (विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क) लागू केला.

या कपातीनंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपये झाले असून, डिझेलवरील शुल्क १० रुपयांवरून शून्यावर आले आहे. यामुळे सरकारचा वार्षिक १.७५ लाख कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०० डॉलरच्या वर गेल्याने देशात पेट्रोल २६ रुपयांनी आणि डिझेल ८१.९० रुपयांनी महागणे अपेक्षित होते. उत्पादन शुल्क कपातीमुळे ही वाढ तूर्तास रोखली गेली.

डिझेलच्या निर्यातीवर प्रतिलिटर २१.५ रुपये शुल्क लागू

सरकारने डिझेलच्या निर्यातीवर प्रतिलिटर २१.५ रुपये आणि विमान इंधनावर (एटीएफ) २९.५ रुपये निर्यात शुल्क पुन्हा लागू केले आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्यात शुल्क ‘विंडफॉल टॅक्स’ म्हणून ओळखले जाते. कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने जुलै २०२२ मध्ये ते पहिल्यांदा लावले होते. नंतर डिसेंबर २०२४ मध्ये ते रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा परिस्थिती बदलल्याने सरकारने हे शुल्क पुन्हा लागू केले आहे.

सरकारी तेल कंपन्यांना सध्या सहन करावा लागतोय तोटा

सरकारी तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर २४ रुपये आणि डिझेलवर ३० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. खासगी किरकोळ विक्रेते ‘नायरा एनर्जी’ने इंधन दरात यापूर्वीच किमतीत ५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तेल कंपन्यांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या निर्णयामुळे दिल्लीत पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रतिलिटर या जुन्याच दराने उपलब्ध असेल.

'टीम इंडिया'सारखे या संकटात काम करू 

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. ‘टीम इंडिया’च्या भूमिकेतून सर्वांनी समन्वयाने काम केल्यास देश ही परिस्थिती यशस्वीपणे हाताळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यांनी पुरवठा साखळी सुरळीत ठेवावी आणि साठेबाजी तसेच नफेखोरीविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. कृषी क्षेत्रात, विशेषतः खत साठवण आणि वितरण यंत्रणेवर सतत देखरेख ठेवत आगाऊ नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.

देशात लॉकडाऊनचा प्रश्नच नाही; इंधनसाठा पुरेसा : केंद्र सरकारचा दिलासा

देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, असा स्पष्ट दिलासा केंद्र सरकारने शुक्रवारी दिला. लॉकडाऊनसारखी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. यावर विचारही केला जात नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पेट्रोल, डिझेल आणि ‘एलपीजी’चा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले. भारताकडे सुमारे ६० दिवसांचा तेलाचा राखीव साठा उपलब्ध आहे आणि एका पूर्ण महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नागरिकांना इंधन, ऊर्जा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित राहील, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. भारतात लॉकडाऊन लागू होईल, या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. भारत सरकारकडे सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. 

८८% कच्च्या तेलाची गरज, निम्मी नैसर्गिक वायूची आवश्यकता व ६०% ‘एलपीजी’ची मागणी पूर्ण करण्यास भारत आयातीवर अवलंबून आहे. यापैकी अर्धे कच्चे तेल, एक तृतीयांश गॅस आणि ८५ ते ९० टक्के एलपीजी होर्मुझमार्गे आखाती देशांतून आयात केले जाते.  भारताने निर्माण झालेली कच्च्या तेलाची तूट  भरून काढली आहे. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Excise duty cut on petrol, diesel; lockdown unlikely, says government.

Web Summary : Government cuts excise duty on petrol, diesel by ₹10, averting price hike. No lockdown planned; fuel stocks sufficient. Imports continue to meet energy needs.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल