भारत अन् पाकमध्ये अणुकेंद्र माहितीची देवाण-घेवाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:17 AM2021-01-02T01:17:00+5:302021-01-02T01:17:14+5:30

एकमेकांच्या अणुकेंद्रांवर हल्ला करू नये, असा करार भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये १९८८ साली झाला होता.

Exchange of nuclear information between India and Pakistan | भारत अन् पाकमध्ये अणुकेंद्र माहितीची देवाण-घेवाण

भारत अन् पाकमध्ये अणुकेंद्र माहितीची देवाण-घेवाण

Next

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने आपापल्या अणुकेंद्रांविषयीची माहिती शुक्रवारी परस्परांना दिली, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या ३० वर्षांपासून अशा माहितीची देवाण-घेवाण सुरू आहे.

एकमेकांच्या अणुकेंद्रांवर हल्ला करू नये, असा करार भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये १९८८ साली झाला होता. या कराराची अंमलबजावणी १ जानेवारी, १९९१ पासून झाली. तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी १ जानेवारीला आपापली अणुकेंद्रे व तेथील यंत्रणांची माहिती दोन्ही देश परस्परांना देतात. जम्मू-काश्मीर तसेच सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया या प्रश्नांवरून भारत व पाकिस्तानचे संबंध अतिशय तणावाचे बनले असले, तरी दोन्ही देश अणुकेंद्रांसंबंधीच्या कराराचे मात्र व्यवस्थित पालन करत आहेत.

Web Title: Exchange of nuclear information between India and Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.