शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 12:51 AM

एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूचे धागे अमली पदार्थांशी जोडले गेल्यानंतर नशा आणि मादक पदार्थांच्या काळ्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. राजपूत प्रकरणात चर्चेत आला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देशात ड्रग्जच्या धंद्याला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्त्वाची संस्था आहे. एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार २०१८-२०१९ मध्ये एनसीबीने जवळपास २५६ किलो हेरॉईन, ३७५ किलो अफू, २.६६ किलो मॉरफीन, ३५१०६ किलो गांजा, ९५० किलो हशीश, २२ किलो कोकेन, २ किलोपेक्षा जास्त मेथाकुआलोन आणि ६० किलोपेक्षा जास्त एमपेथामाईनस पकडले होते. याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७.६० लाख गोळ्या, १०,३०० इंजेक्शन आणि १२८ किलो एफेड्रिन जप्त केले होते. एनसीबीने वेगवेगळ्या सरकारी एजन्सींच्या मदतीने अरुणाचल, बिहार, जम्मू-कश्मीर, झारखंड, मणिपूर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ७८८७ एकरवर उभे अफीमचे बेकायदा पीक नष्ट केले.

गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एजन्सीने यादरम्यान आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा,त्रिपुरा आणि तेलंगणामध्ये ४३०० एकरमध्ये गांजाचे उभे पीक नष्ट केले होते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान १२ महिन्यांत एजन्सीने न्यायालयाच्या माध्यमातून फक्त ६१ प्रकरणांतच शिक्षा दिली. एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात एनसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, वर्ष २०१८ मध्ये नशेच्या पदार्थप्रकरणी देशभरात ४९,४५० प्रकरणांत ६०१५६ लोकांना अटक झाली होती. गृहमंत्रालयाच्या २०१७-२०१८ च्या वार्षिक अहवालानुसार एनसीबीद्वारे ४५ प्रकरणी न्यायालयाने शिक्षा दिली.

टॅग्स :IndiaभारतDrugsअमली पदार्थ