शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, अक्षय कुमारसोबत होणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:01 IST

इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप झाल्याने वादात सापडलेला पद्मावती चित्रपट अखेर पद्मावत या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाचा मुहूर्तही ठरला आहे.

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 1 डिसेंबर रोजी होणारं सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार, याकडे बॉलिवूड तसंच चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. पण शेवटी प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला. इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप झाल्याने वादात सापडलेला पद्मावती चित्रपट अखेर पद्मावत या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाचा मुहूर्तही ठरला आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी अक्षय कुमारचा बहुचर्चित 'पॅडमॅन'ही चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. त्यामुळं यापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पद्मावती चित्रपट सुरुवातीला 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र वाद निर्माण झाल्याने प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. त्यांनी चित्रपटात सुचवलेल्या पाच सुधारणा केल्यानंतर यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आता 'पद्मावत' या नावाने चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. पद्मावती सिनेमाच्या पोस्टर आणि नंतर ट्रेलर लॉन्चपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध राजपूत संघटनांनी भन्साळींच्या या भव्य सिनेमाला विरोध करत त्यात सहभागी कलाकारांना धमकावलंसुद्धा. राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन करत हा सिनेमा साकारण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी लावला. 

काय आहेत बदल  केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत. सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.

राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा असे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी