पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर अंत्यसंस्कार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:55 IST2025-10-14T14:54:11+5:302025-10-14T14:55:04+5:30
मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला आत्महत्या केली होती.

पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर अंत्यसंस्कार नाहीत
चंडीगड : हरियाणातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पूरणकुमार यांच्या आत्महत्येनंतर पाच दिवस उलटले तरी त्यांच्या पार्थिवाच्या शवविच्छेदनाचा व अंत्यसंस्काराचा पेच कायम आहे.
पूरणकुमार यांची आयएएस पत्नी अमनीत यांनी शवविच्छेदनास नकार दिला असून पोलिस महासंचालक शत्रूजीत कपूर, तसेच रोहतकचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारणिया यांना आधी अटक करण्यात यावी, या मागणीवर त्या अडून आहेत.
मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला आत्महत्या केली होती.
आठ अधिकाऱ्यांवर आरोप
पूरणकुमार यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये पोलिस महासंचालक शत्रूजीत कपूर, रोहतकचे माजी पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारनियांसह आठ ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचा व प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता.
पोलिस अधीक्षकांची बदली
या घटनेनंतर चंडीगड प्रशासनाने रोहतकचे तत्कालीन पोलिस अधीक्षक बिजारनिया यांची बदली केली असून अद्याप नवीन नियुक्ती दिलेली नाही. पोलिस महासंचालक कपूर यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.