शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतरही मृतांचा नेमका आकडा उपलब्ध नाही

By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST

निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे.

भोपाळ : १९८४ सालच्या २ व ३ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाईड या कंपनीत मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे. याचसोबत या कंपनीच्या परिसरात तेव्हापासून पडून असलेल्या व प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ३५० टन कचऱ्याचीही विल्हेवाट अद्याप लावलेली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.या दुर्घटनेत २५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा स्वयंसेवी संस्था एकीकडे करत असताना राज्य सरकार मात्र हा आकडा केवळ ५,२९५ एवढा असल्याचे सांगताना दिसत आहे. भोपाळ वायूगळती दुर्घंटना मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी, आतापर्यंत ५,२९५ एवढ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे सांगितले. तर भोपाळ ग्रूप फॉर इन्फर्मेशन अ‍ॅन्ड अ‍ॅक्शनच्या कार्यकर्त्या रचना ढिंगरा यांनी हा आकडा २५ हजाराहून अधिक असल्याचे म्हटले आहे. २०१२ सालच्या घोषणेनुसार राज्य सरकारने दुर्घटनेबाबत स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या समितीने १५३४२ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यासाठी १०-१० लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी केली होती. दरम्यान, भोपाळ विषारी वायू गळती कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संसदेने श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे दुर्घटनेस कारणीभूत कंपनीच्या प्रतिमेचे भोपाळमध्ये दहन करण्यात आले. (वृत्तसंस्था)