शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:46 IST

कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) च्या योजनेचा विस्तार करणार आहे. याचा उद्देश अधिक पगार असलेल्या नोकरदारांना, कामगारांना ईएसआयसीच्या योजनांचा फायदा होऊ शकेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने ESIC च्या आरोग्य विमा योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे. 

या प्रस्तावामध्ये ज्या कामगारांचा पगार 30000 रुपये आहे त्यांनादेखील आरोग्य विम्याचे संरक्षण आणि इतर फायदे देण्यात यावेत असे म्हटलेले आहे. सध्या ईएसआयसीच्या फायद्यांसाठी 21000 रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारीच पात्र होते. त्यांच्या पगारातील काही रक्कम ईएसायसीला जाते. यामुळे ते आरोग्य विम्याचे लाभार्थी होतात. अशा कामगारांना इन्शुअर्ड पर्सन म्हटले जाते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातील 0.75 टक्के आणि कंपनीकडून 3.25 टक्के रक्कम  ESIC मध्ये जमा करते. याबदल्यात कर्मचाऱ्याला आरोग्य विमा आणि कॅश बेनिफिट दिले जातात.

एका सरकारी अधिकाऱ्यानुसार कामगार मंत्रालयाने आपल्या सर्व्हेमध्ये कोरोना संकटामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये ESIC सोबत जोडण्यासाठी सध्याच्या अटी शिथिल केल्या जाव्यात.

नोकरी गमावलेल्या कामगारांना दिलासाकोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या 24 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

CoronaVirus: कोरोना लस: भारत आज मोठे पाऊल टाकणार; पुण्यावरच सारी मदार

IPL 2020: "आता कुठेही जाणार नाही, 2020 घरातच"; कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही ख्रिस गेलचे वेगळे 'संकेत'

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप

Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या