Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:55 IST2025-05-22T12:55:04+5:302025-05-22T12:55:45+5:30

Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथे सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरलं असून, त्यापैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चकमक अद्याप सुरू असून, आणखी दोन दहशतवादी या परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे.

Encounter In Kashmir: Two terrorists killed in encounter in Kishtwar, Kashmir, both surrounded by army | Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 

Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण होत असतानाच काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आज काश्मीरमधील किश्तवाड येथे सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरलं असून, त्यापैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चकमक अद्याप सुरू असून, आणखी दोन दहशतवादी या परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे.

या चकमकीबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरक्षा दलांनी किश्तवाडमधील सिंहपोरा, चटरू परिसरात ३ ते चार दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर शोधमोहीम सुरू करत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. लष्कर आणि सुरक्षा दलांकडून संयुक्त कारवाई सुरू असून, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. परिसराला पूर्णपणे घेराव घालण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले चार दहशतवादी अद्याप फरार आहेत. लष्कराकडून त्यांच्या शोध सुरू आहे. हे दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले असण्याची किंवा पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: Encounter In Kashmir: Two terrorists killed in encounter in Kishtwar, Kashmir, both surrounded by army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.