जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 16:54 IST2020-10-14T16:52:25+5:302020-10-14T16:54:16+5:30

Shopian encounter : दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या परिसरात अद्याप शोधमोही सुरू आहे.

Encounter between Soldier and terrorists in Jammu and Kashmir, two terrorists killed | जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ठळक मुद्दे आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवाशी असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यांतील चाकुरा परिसरात आज जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली. दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या परिसरात अद्याप शोधमोही सुरू आहे.

जम्मू-काश्मीर खोऱ्यात काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसताच जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केले होते. दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर - ए - तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील खात्मा करण्यात आला आहे. तर आज दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पाकिस्तानातील लष्कर - ए - तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. तर, आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवाशी असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.

 

Web Title: Encounter between Soldier and terrorists in Jammu and Kashmir, two terrorists killed