शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

फ्लिपकार्टचे कर्मचारी झाले मालामाल; वॉलमार्टच्या खरेदीमुळे लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 11:43 AM

कंपनीच्या शेअर्सचं मूल्य वाढल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

नवी दिल्ली: वॉलमार्टनं फ्लिपकार्ट कंपनी खरेदी करत भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकलंय. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील या व्यवहारामुळे फ्लिपकार्टचे कर्मचारी मालामाल झालेत. वॉलमार्टनं 22 अब्ज डॉलर मोजून फ्लिपकार्ट कंपनी खरेदी केली. यामुळे फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होणाराय. भारतीय कंपन्यांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ ठरलीय. दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारामुळे एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लानमधील (ईसॉप्स) संपत्तीचं मूल्य 13 हजार 455 कोटी म्हणजेच 2 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचलंय. फ्लिपकार्टच्या आजी-माजी 100 कर्मचाऱ्यांकडे ईसॉप्स आहेत. वॉलमार्टनं फ्लिपकार्ट खरेदी केल्यामुळे ईसॉप्सच्या किमतीत मोठी वाढ झालीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट ईसॉप्ससाठी 100 टक्के बायबॅक ऑफर आणणार आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग असलेल्या कर्मचाऱ्याला एका समभागामागे 150 डॉलर म्हणजेच 10 हजार रुपये मिळतील. मात्र समभाग विकायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कर्मचाऱ्याचा असेल. यामुळे कंपनीचे अनेक आजी-माजी कर्मचारी कोट्यधीश होतील. यामध्ये फोनपे सीईओ आणि संस्थापक समीर निगम, फ्लिपकार्टच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी आमोद मालवीय, वेबफॉर्म उडानच्या ऑपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजीत कुमार यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टकडून चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग दिले जात होते. कर्मचारी दर महिन्याला हे समभाग कंपनीला विकू शकत होता. फ्लिपकार्टसोबतच ऍक्सिस बँक, विप्रो, एचसीएल टेक या कंपन्यादेखील कर्मचाऱ्यांना समभाग देतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होते. कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत वाढ करण्यात इन्फोसिस देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टEmployeeकर्मचारी