वीज विभागाचा कारनामा! शे, बाराशे नाही तर लिंबू सरबत विक्रेत्याला आलं तब्बल 1.6 कोटीचं बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:29 PM2021-06-18T12:29:29+5:302021-06-18T12:50:59+5:30

Electricity Bill : हजार, बाराशे नव्हे तर तब्बल 1.6 कोटींचं बिल आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे.

electricity department gave bill of 16 crores during lock down to lemonade seller in rajasthan | वीज विभागाचा कारनामा! शे, बाराशे नाही तर लिंबू सरबत विक्रेत्याला आलं तब्बल 1.6 कोटीचं बिल

वीज विभागाचा कारनामा! शे, बाराशे नाही तर लिंबू सरबत विक्रेत्याला आलं तब्बल 1.6 कोटीचं बिल

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. हजार, बाराशे नव्हे तर तब्बल 1.6 कोटींचं बिल आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. लिंबू सरबत विकणाऱ्याला भलं मोठं बिल पाठवण्यात आलं आहे. वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्राहक मीटरचे रीडिंग न घेता सरासरी रकमेच्या दोन ते चार पट बिल (Electricity Bill) पाठवल्याचा घटना उघडकीस आल्या आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या मकराना शहरात ही संतापजनक घटना समोर आली आहे. वीज वितरण कंपनी डिस्कॉमने रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या अब्दुल सत्तार नावाच्या व्यक्तीला दोन महिन्यांचे विजेचं 1 कोटी 59 लाख 96 हजार 143 रुपये इतकं बिल पाठवलं आहे. इतक्या मोठ्या रकमेचे बिल पाहून या व्यक्तीला पहिल्यांदा बिलावर विश्वासच बसला नव्हता. मात्र याची अधिक चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी टायपिंगचं कारण दिलं आहे. या प्रकरणाची माहिती डिस्कॉमच्या अधिकाऱ्यांना मिळताच घाईघाईने संध्याकाळी उशीरा बिलातील चूक दुरुस्त करून आणि टायपिंगच्या चुका झाल्याचे सांगून मूळ 1500 रुपये आले असल्याचे सांगितले. 

अब्दुल सत्तार यांनी घरासाठी फक्त एक किलोवॅट वीज कनेक्शन घेतलं आहे. मात्र यावेळी 5 मे रोजी दोन महिन्यांकरिता वीज बिलाचे रीडिंग 18,59,783 युनिट आलं. त्यावर बिल जमा करण्याची शेवटची तारीख 17 जून दाखवली होती, त्यात एकूण थकबाकी 1 कोटी 59 लाख 96 हजार 143 रुपये होती. बिलाचा आकडा पाहून सर्वांना धक्काच बसला होता. त्यानंतर याबाबत तक्रार केली असता त्यानंतर नेमकं बिल देण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटात  भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नोकरी गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे तरुण आहेत किंवा अगदी जुने कर्मचारी आहेत. फॉर्च्यून 500 लिस्टच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतात एप्रिल 2021 दरम्यान 2000 लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. 

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएस (FIS) द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी स्थायी स्वरुपात गेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 4 टक्के होता. तर 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रेशर्समध्ये 11 टक्के लोकांनी स्थायी स्वरुपात नोकरी गमावली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 10 टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMII) ने मेमध्ये असे म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये 1 कोटीपेक्षी अधिक भारतीयांनी नोकरी गमावली आहे. बेरोजगारी दर 12 महिन्यातील सर्वोच्च आहे. हा दर 12 टक्के एवढा झाला आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: electricity department gave bill of 16 crores during lock down to lemonade seller in rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app