शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

IAS च्या नोकरीचा राजीनामा देत भाजपाकडून निवडणूक लढली, पण तेलंही गेलं अन् तूपही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 22:14 IST

छत्तीसगडमध्ये चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं अन् हाती धोपाटणं आलं.

रायगढ - छत्तीसगडमध्ये एका माजी कलेक्टरला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत उमेदवारी मिळाली म्हणून या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. खरसिया विधानसभा मतदारसंघातून भाजपने ओ.पी. चौधरी यांना तिकीट दिले होते. मात्र, काँग्रेस उमेदवार उमेश पटेल यांनी 8250 मतांनी चौधरी यांचा पराभव केला. 

छत्तीसगडमध्ये चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं अन् हाती धोपाटणं आलं, अशी अवस्था या उमेदवाराची झाली आहे. कारण, निवडणूक लढविण्यासाठी चौधरी यांनी नोकरीचा राजीनामा दिला, त्यामुळे नोकरीही गेली अन् आमदारकीही मिळाली नाही. आता, केवळ भाजपा कार्यकर्ता म्हणूनच या उमेदवाराला फिरावे लागणार आहे. मात्र, पराभव झाल्यानंतरही चौधरी यांनी विजयी उमेदवाराची गळाभेट घेत मैत्रीपूर्ण लढतीचा संदेश दिला. ज्यावेळी चौधरी हे उमेश पाटील यांना भेटायला निघाले होते, त्यावेळी आता गोंधळ होईल असे पोलिसांना वाटले. पण, चौधरी यांनी जादू की झप्पी दिल्यानं पोलिसांचा ताण हलका झाला.

चौधरी यांचा पराभव करणारे उमेश पटेल हे काँग्रेसचे कद्दावर नेता राहिलेल्या नंदकुमार पटेल यांचे पुत्र आहेत. त्यामुळे उमेश पटेल यांना पराभूत करणे हे भाजपासाठी मोठे आव्हान होते. मात्र, 12 वर्षे आयएएस म्हणून नोकरी करणाऱ्या ओपी चौधरी यांनी भाजपाकडून उमेदवारी घेतली. त्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामाही दिला. त्यामुळे भाजपाला विजयाची खात्री वाटत होती. मात्र, भाजपा अन् ओपी चौधरी यांचा पराभव झाला. छत्तीसगड येथून 2005 च्या बॅचचे आयएएस ओपी चौधरी यांनी आमदारकीसाठी एका झटक्यात 12 वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागातील शैक्षणिक कामाची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते 2011-12 मध्ये पंतप्रधान एक्सलंट अवॉर्डनेही चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं होतं. नोकरीत अतिशय चांगल काम सुरू असतानाही चौधरी यांनी राजीनामा देत भाजपाकडून निवडणूक लढवली. मात्र, दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे तेलही गेलं अन् तूपही... हाती धोपाटणं आलं, अशीच अवस्था ओपी चौधरी यांची झाली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcollectorजिल्हाधिकारीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018