शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

२०१९ च्या निवडणुका अमित शहांच्या नेतृत्वातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:59 IST

भाजप २०१९ च्या निवडणुका पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वातच लढविणार आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजप २०१९ च्या निवडणुका पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वातच लढविणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ पुढे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सूत्रांनी सांगितले की, अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारीत संपणार होता. हा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय दिल्लीत शनिवारी सुरु झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या दिवशी घेण्यात आला. पक्षाच्या अध्यक्षपदाची पुढील निवडणुकही स्थगित करण्यात आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेहरा बनविण्याचा निर्णय यापूर्वी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. मोदी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर शहा यांची आॅगस्ट २०१४ मध्ये भाजपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.२०१९ मध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प करतानाच शहा यांनी असा दावा केला की, यावेळेचा विजय २०१४ पेक्षा मोठा असेल. ‘अजेय भाजप’चा नारा देतानाच त्यांनी सांगितले की, भाजपकडे जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारीत समाप्त होणार आहे. पण, याच काळात डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मेघालयमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मेघालय वगळता अन्य सर्व राज्य लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या निवडणुकांनंतर देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु होईल. त्यामुळे भाजपने संघटनात्मक निवडणूक स्थगित करुन लोकसभा निवडणुकांनंतर अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९