भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:55 IST2023-12-03T11:44:04+5:302023-12-03T11:55:54+5:30
Election Results 2023 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.

भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!
चार राज्यांतील मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सकाळी मतमोजणीपूर्वी काँग्रेसकडून दिल्ली आणि भोपाळमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, कल पक्षाच्या विरोधात जात असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, तीन राज्यात आघाडी मिळाल्यानंतर आता भाजपने सुद्धा जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संध्याकाळी ५ वाजता भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6.30 वाजता भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी जनतेते आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून स्पष्ट बहुमतासाठी 116 जागांची गरज आहे. 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत या ठिकाणी पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. यंदा सुद्धा राजस्थान ही परंपरा राखणार असल्याचे दिसून येत आहे आहे.
छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये 2018 मध्ये 15 वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली होती. परंतु आता याठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कलामध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसून आली. याचबरोबर, तेलंगणात विधानसभेसाठी 199 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे.
चार राज्यातील 11 वाजेपर्यंतचे कल
मध्य प्रदेश – 230
बीजेपी – 155
कांग्रेस – 71
अन्य – 4
राजस्थान – 199
बीजेपी – 107
कांग्रेस – 75
अन्य – 17
छत्तीसगढ़ – 90
बीजेपी – 54
कांग्रेस – 35
अन्य – 1
तेलंगाना – 119
कांग्रेस+ – 63
बीआरएस – 42
बीजेपी + – 9
AIMIM – 4
अन्य – 1