शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Election Result 2022 : 'पराभवातून शिकू...'; पाचही राज्यांत काँग्रेसची पिछाडी; राहुल गांधी आशावादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:26 IST

Election Result 2022 : गुरूवारी पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Election Result 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे बहुतांश निकाल आता स्पष्ट होत आहेत. काँग्रेसला पाचही राज्यात मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी आपण जनतेचा निर्णय स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. 

"आम्ही जनतेचा निर्णय स्वीकारत आहोत. ज्या लोकांना जनतेनं कौल दिला त्यांना हार्दिक शुभेच्छा. मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वॉलेंटिअर्स यांना शुभेच्छा. आम्ही यातून शिकू आणि जनहितासाठी काम करत राहू," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  पंजाबमध्ये आपची मुसंडीपंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी घेतली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणदीप सिंग चन्नी यांचा दोन्ही जागेवरून पराभव झाला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानं काँग्रेसचा सुपडा साफ करत जवळपास ९२ जागांपर्यंत मुसंडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवरच समाधान मानावं लागल्याचं चित्र दिसून येतंय. तर भाजपला २ आणि अकाली दलाला ४ जागांवर समाधान मानावं लागल्याचं दिसतंय.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक