शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 05:50 IST

"महाराष्ट्रात एक कोटी नवे मतदार जादूने तयार"

सासाराम (बिहार) : बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या आडून मतांची चोरी करण्याचा डाव आखला जात आहे. मात्र विरोधी पक्ष  कोणत्याही परिस्थितीत ‘निवडणूक चोरी’ होऊ देणार नाही. निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून संपूर्ण देशात मतांची चोरी करीत असल्याचे आता लपून राहिले नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बिहारमधून मतचोरीच्या विरोधात ‘मतदार हक्क यात्रा’ प्रारंभ केली. त्यावेळी त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, ही संविधान वाचविण्याची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप संविधान संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील वाढीचा दाखला देत दावा केला की, सर्व नवे मतदार भाजपकडे गेले. तसेच बेंगळुरूतील महादेवपुरा मतदारसंघातील मतदार याद्यांतील घडामोडींचा उल्लेख त्यांनी केला. 

भाजपच्या लोकांकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने का मागितले नाही, असा सवाल राहुल यांनी केला.

कोण काय म्हणाले?

महाराष्ट्रातील एक्झिट पोल चाचण्या सांगत होत्या की, इंडिया आघाडी निवडणुका जिंकेल. लोकसभेत इंडिया आघाडी जिंकते; पण चार महिन्यांत आपण त्याच भागात हरतो. जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की एक कोटी नवीन मतदार जादूने तयार झाले आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस नेतेसंविधान धोक्यात आहे, भाजप सत्तेत असेपर्यंत लोकांचे अधिकार सुरक्षित नाहीत. आयोग केंद्र सरकारचा एजंट झाले आहे. २०२३ मध्ये सरकारने असा कायदा केला की, आयोगातील सदस्यांनी गडबड केली, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेसदेशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. यावेळी भाजपला कोणत्याही किमतीत सत्तेत येऊ देऊ नये. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला हाकलून लावावे, जेणेकरून आपली लोकशाही मजबूत होईल.- लालूप्रसाद यादव, अध्यक्ष, राजदलोकशाहीची जननी बिहारमधून लोकशाही संपू दिली जाणार नाही. ही  मतचोरी चनाही, तर हा एक भलामोठा दरोडा आहे.-तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा