शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 12:54 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षण

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षणकाही वर्षांपूर्वीच कुटुंबीय मुंबईतून सुरतमध्ये झाले होते स्थायिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याला अद्यापही काही राज्यांनी परवानगी दिली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अद्यापही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन वर्गात आपल्याला शिकवलेलं काहीच कळत नाही असं लिहून गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या एका तंबाखू विक्रेत्याच्या मुलान पळ ठोकला. आई-वडिल बाहेर गेले असताना त्यानं कथितरित्या घर सोडल्याचं समोर आलं आहे. हा विद्यार्थी आठवीत शिकत होता.सोमवारी आपल्या सुरत येथील घरातून बेपत्ता झालेला १४ वर्षाचा मुलगा आपल्या घरापासून जवळपास २८० किलोमीटर दूर मुंबईनजीकच्यामीरा-भाईंदर परिसरात सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही अंतरापर्यंत सायकलवरून आणि काही अंतर ट्रकमधून पार करत तो मीरा-भाईंदर परिसरापर्यंत पोहोचला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरतमध्ये राहणारा हा विद्यार्थी ऑनलाईन वर्ग आणि नोट्सना कंटाळला होता. यामुळेच तो घर सोडून पळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यावेळी तो बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या वडिलांना त्या मुलाचा फोन आणि एक नोट सापडली. "आई-बाबा मी तुम्हाला खुप त्रास दिला आहे. आता मी खुप दूर जात आहे. ऑनलाईन वर्गातून मला काहीच समजत नाही. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो," असं कथितरित्या त्या नोटमध्ये लिहिलं असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेजही तपासल. त्यामध्ये तो केवळ एक बाटली पाणी घेऊन आपल्या सायकलवरू जात असल्याचं पोलिसांना दिसून आलं होतं. तो मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. "आपण पाच वर्षभरापूर्वीच मुंबईतून सुरतमध्ये राहण्यास आलो आहोत. यापूर्वी भाईंदर येथे आम्ही राहत होतो," असं त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाचे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना झाले. "ऑनलाईन शिकवण्यात येणाऱ्या वर्गांमध्ये त्याला काहीही समजत नव्हतं हे तो घरातून पळून जाण्यामागील मुख्य कारण होतं. आम्ही त्याच्या मोबाईलच्या वापराचाही तपास करू. पण घरातील कोणीही त्याच्यावर अभ्यासाठी दबाव आणला नाही," अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुलगा २० किलोमीटरपर्यंत सायकलवर गेला. त्यानंतर महामार्गावरून त्यानं नवसारीसाठी लिफ्ट मागितली. त्यानंतर पुन्हा त्यानं थोडा सायकलवर प्रवास केला. त्यानंतर तो ट्रकमधून लिफ्ट घेत महाराष्ट्रात पोहोचला. सध्या मुलाचे आईवडिलही मुंबईत पोहोचले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीonlineऑनलाइनGujaratगुजरातSuratसूरतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMira Bhayanderमीरा-भाईंदर